EWS गृहनिर्माण धोरण: दंडात्मक कारवाईऐवजी ‘प्रोत्साहनाधारित’ पावले उचला!

Developers strong demands to Maharashtra Government

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) परवडणाऱ्या घरांची निर्मिती जलद गतीने करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन गृहनिर्माण धोरणात (EWS Policy) महत्त्वपूर्ण सुधारणा कराव्यात, अशी मागणी राज्यातील अनेक विकसकांनी (Developers) शासनाकडे केली आहे. या संदर्भात नगर विकास विभागाच्या सचिवांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, यात धोरणाला ‘दंडात्मक’ स्वरूप देण्याऐवजी ते ‘प्रोत्साहनाधारित’ आणि व्यावहारिक बनवण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. बी पॉझिटिव्ह मीडिया या मागणीचे जोरदार समर्थन करत आहे